Free Software for Creators - Digital Initiatives In Higher Education

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग ३ )

नमस्कार मित्रांनो मी सचिन,

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असताना कालच्या भाग मध्ये जास्त विकणारे किंवा खरेदीदार यांची ऑनलाईन जास्त मागणी असणारे प्रॉडक्ट हे कसे शोधायचे या बद्दल माहिती घेतली.

आजच्या भाग मध्ये आपण जे प्रॉडक्ट ऑनलाईन विक्रीसाठी निवडले आहेत ते आपल्याला जास्त नफा मिळवण्यासाठी कोठून खरेदी करावी या बद्दल माहिती घेणार आहोत..

उदा. साठी https://www.amazon.in/ या वेबसाईटवरील बेस्ट सेलर कोणते प्रॉडक्ट चा अभ्यास केला.. त्या मधून Toys & Games ही कॅटेगिरी निवडले आहे.

या मधील बेस्ट सेलर क्रमांक 5 चा प्रॉडक्ट Super Toy LCD Writing Tablet 8.5 Inch E-Note Pad हा प्रॉडक्ट मला कमी किंमती मध्ये जास्त नफा आणि कमी रिस्क मध्ये कोठे मिळू शकेल याचा अभ्यास करत असताना. लोकल होलसेल दुकानदार किंवा ऑनलाईन मध्ये पाहिले तेव्हा https://www.alibaba.com/ या वेबसाईटवर हा प्रॉडक्ट कमी किंमतीत मिळत आहेत त्याच बरोबर त्या साठी लागणार पॅकिंग आणि आपल्या पर्यंत पोहचण्यासाठी लागणार खर्च याचा अभ्यास करत आहे. वेबसाइट वरती डॉलर मध्ये किंमत दाखवत आहे म्हणून मी अँप पण इन्स्टॉल केले आहे

तर मी निवडलेला प्रॉडक्ट हा किती दर्जेदार आणि किती कमी किंमतीत मिळतो आहे या बद्दल मी आणखी सर्च करतो आहे त्याच्या लिंक मी सेव्ह करत आहे .. त्याच बरोबर किती पीस विकत घ्यावे लागतात आहे पेयमेन्ट कसे करावे या बद्दल संपूर्ण अभ्यास करत आहे .. या पुढील भागा मध्ये अकाउंट तयार करून ऑर्डर आणि पेमेंट कसे करता येईल या बद्दल माहिती घेऊ ..

काही सूचना असतील तर आपण sachinppatange@gmail.com या ईमेल वरती दयाव्यात… मी प्रथमच लिहण्याचा प्रयत्न करीत आहे .. आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्न आणि उत्तरे मांडण्याचं प्रयत्न करत आहे ..
धन्यवाद…!

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग १ )

Home

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग २ )

नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग २ )

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *