नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसायाकडे ( भाग ५ )
नमस्कार मित्रांनो मी सचिन,
नोकरीकडून स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असताना कालच्या भाग मध्ये आपण अलिलाबा या वेबसाईट वर आपले अकाउंट कसे काढावे या बद्दल माहिती पहिली . आज आपण आपल्या नफा प्रमाणे सर्वानी प्रॉडक्ट ऑर्डर साठी प्रोसेस केली असे समजून पुढील काही दिवसात आपल्या कडे आपले प्रॉडक्ट येतील.
आता आपल्याला ऑनलाईन प्रॉडक्ट ऑनलाईन विकण्यासाठी एका ऑनलाईन दुकान सेटअप करावे लागेल त्या साठी आपल्या कडे खूप ऑपशन आहेत
१. सध्या प्रसिद्ध असलेले ऑनलाईन मार्केटप्लेस जसे उदा. अमेझॉन, फ्लिपकार्ट, फेसबुक
२. सध्या प्रसिद्ध असलेले विविध अँप उदा. Dukaan App
३. आपली स्वतःची मोफत वेबसाइट
४. आपली स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट
– सध्या प्रसिद्ध असलेले ऑनलाइन मार्केट प्लेस जसे ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा इतर हे सर्व जण आपल्या प्रोडक्ट ऑनलाइन विक्री करून देतात त्यासाठी आपल्याला यांच्याकडे वेंडर म्हणून रजिस्टर व्हावे लागते तर हे वेंडर म्हणून रजिस्टर होण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता पूर्ण करणं गरजेचं आहे. ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या वेबसाईटवर सेलर म्हणून रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला जीएसटी नंबर हा सर्वात महत्त्वाचा आहे. हा जीएसटी नंबर हा रेगुलर जीएसटी. जेव्हा आपला प्रॉडक्ट विकला जाईल तेव्हा या प्रोडक्ट मधील काही टक्के कमिशन हे या कंपन्या घेऊन उर्वरित रक्कम ही आपल्या खात्यामध्ये जमा करतात यामध्ये प्रत्येक कंपन्यां त्यांचे नियम हे त्या त्या कंपन्यांनी ठरवलेले आहेत. पण सुरुवात करताना आपल्याला एक गोष्ट कंपल्सरी आहे ती जीएसटी नंबर.
– आपला पर्याय क्रमांक दोन सध्या प्रसिद्ध असलेली विविध ॲप जसे दुकान ॲप आहे या ॲप मध्ये जेव्हा आपण सेलर म्हणून रजिस्टर करता तेव्हा आपल्याला जास्त कागदपत्रांची पूर्तता करण्याची आवश्यकता नाही.
– पर्याय क्रमांक तीन यामध्ये आपल्याला आपल्या स्वतःची मोफत वेबसाइट बनवून मिळते जसे वर्डप्रेस आहे विक्स आहे त्याच बरोबर आणखी सारे प्लॅटफॉर्म आहेत की जे प्लॅटफॉर्म आपल्याला मोफत वेबसाइट बनवून देतात. जेव्हा आपण गुगलला माय बिजनेस रजिस्टर करतो तेव्हा आपल्याला गुगल बिझनेस देते याच प्रमाणे या मोफत वेबसाइट या वरती आपण आपला बिझनेस रजिस्टर करून आपल्या व्यवसायाबद्दलची आपल्या प्रॉडक्ट बद्दलची आपण माहिती देऊ शकतो पण जेव्हा एखाद्या ग्राहकाला ऑर्डर करायची असते तेव्हा तो आपल्याला डायरेक्ट संपर्क करून ऑर्डर करू शकतो.
पर्याय क्रमांक चार यामध्ये आपल्या स्वतःची इ कॉमर्स वेबसाइट यामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडाफार खर्च होऊ शकतो.
या नंतरच्या पुढील भागामध्ये आपल्या व्यवसायाची आपण वेबसाइट कशी बनवायची याबद्दल आपण माहिती घेणार आहोत ते पण मोफत फ्री.
काही सूचना असतील तर आपण sachinppatange@gmail.com या ईमेल वरती दयाव्यात… मी प्रथमच लिहण्याचा प्रयत्न करीत आहे .. आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्न आणि उत्तरे मांडण्याचं प्रयत्न करत आहे ..
धन्यवाद…!